Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील शहरातील एका भागात  अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्याच परिसरात राहणारा विवेक उर्फ बॉबी विजय सोनवणे याने पिडीत मुलीला लग्नाचे आमिष दाखवत कुटुंबाच्या कायदेशीर रखवालीतून फूस लावून पळवून नेल्याची घटना बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आली. पिडीत मुलीच्या नातेवाईकांना घटना समजल्यानंतर त्यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला परंतू तिच्याबाबत कोातीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात विवेक उर्फ बॉबी यानेच मुलीला फूस लावून पळवून नेले आहे अशी तक्रार दिली आहे. त्यानुसार बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता संशयित आरोपी विवेक उर्फ बॉबी विजय सोनवणे याच्या विरोधात रामानंद नगर  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे करीत आहे.

Exit mobile version