Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आईवडीलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका गावात पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला आईवडीलांना जीवेठार मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. तिच्याच गावात राहणारा सोनू बाळू पडोळ याने पिडीत मुलीला तिच्या आईवडलांना जीवेठार मारण्याची धमकी देत जानेवारी २०२३ मध्ये दोन वेळा आणि एप्रिल २०२३ मध्ये एक वेळा असे तीन वेळा अत्याचार केला. हे सर्व करण्यासाठी ज्योती ज्ञानेश्वर चौधरी ही देखील मदत केली. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत मुलीने जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून ज्योती ज्ञानेश्वर चौधरी, सोनू बाळू पडोळ या दोघांवर जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयित आरोपी सोनू पडोळ याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय येरूळे करीत आहे.

Exit mobile version