Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तांबापूरातून भागातून अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले; एकावर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील तांबापूरा परिसरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शहरातील तांबापुरा भागात १७ वर्षीय मुलगी आपल्या आईवडीलांसह राहते. मंगळवार २९ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास मास्टर कॉलनीतील तावेश उर्फ तांबू (पुर्ण नाव माहित नाही) याने मुलीला फुस व आमिष दाखवत पळवून नेल्याचे उघडकीला आले. तरूणाच्या घरीजावून व नातेवाईकांकडे चौकशी केली असता मुलगी मिळून आली नाही. एमआयडीसी पोलीसात मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून तावेश उर्फ ताबू याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि गणेश कोळी करीत आहे. 

 

Exit mobile version