Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलीला पळवून नेत केला अत्याचार; संशयिताला अटक

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला दोन महिन्यापुर्वी फुस लावून पळवून नेत अत्याचार करणाऱ्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरोधात पोक्सो कायाद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गावातील साहिल जावेद शेख (वय-२२) याने फुस लावून ७ एप्रिल २०२१ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास फुस लावून पळवून नेले. पिडीत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपी याने अल्पवयीन मुलीला पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे घेवून गेला. जीवे ठार मारण्याची धमकी देवून तिच्यावर अत्याचार केला. अशी माहिती बाल कल्याण समिती जळगाव यांच्या समोर दिलेल्या जबाबात म्हटले आहे. त्यानुसार संशयित आरोपी साहिल जावेद शेख यांच्या विरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनील आज बुधवारी दुपारी २ वाजता अटक केली आहे. पुढील तपास सपोनि अमोल मोरे करीत आहे. 

 

Exit mobile version