Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

crime 2

 

जळगाव प्रतिनिधी| शहरातील पार्वती नगर भागातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, रामानंदनगर जवळील पार्वती नगरात अकरावीत शिकणारी अल्पवयीन मुलगी कॉलेजला जाते असे सांगून 20 जुलै रोजी सकाळी 10 वाजता घरून निघाली होती. परंतू दुपारी 4 वाजेपर्यंत घरी परत न आल्याने तिच्या पालकांनी रामानंद नगर पोलिसात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय श्रीमती काळे या करीत आहे.

Exit mobile version