बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नुतन मराठा महाविद्यालय परिसरात कोचींग क्लासला जात असलेल्या बारावीतील विद्यार्थींनाचा पाठलाग करून लग्नासाठी मागणी घालत धक्काबुक्की करून विनयभंग केल्याची बुधवारी २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी २९ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही वास्तव्याला आहे. सध्या ती १२वाीचे शिक्षण घेत असून तीने नुतन मराठा महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या एका खासगी कोचींग क्लास लावलेला आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पिडीत मुलगी ही कोचींग क्लाससाठी जात असताना एक १७ वर्षीय मुलगा तिचा पाठलाग करत होता. त्यानंतर त्याने पिडीत मुलीकडे लग्नाची मागणी घालत अंगलट करण्याचा प्रयत्न करत होता. पिडीत मुलीने लग्नास नकार दिला. या रागातून त्याने तिच्या सोबत धक्काबुक्की करत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पिडीत मुलीने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार गुरूवारी २९ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता अल्पवयीन मुलावर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिरा देशमुख ह्या करीत आहे.

Protected Content