Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलीला दुचाकीवर बसवून पळविले

चोपडा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील घुमावल येथील महिलेला मारहाण करून तिच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने दुचाकीवर बसवून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी मंगळवार १७ मे रोजी दुपारी अडावद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, “चोपडा तालुक्यातील घुमावल येथे १७ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १७ मे रोजी सकाळी अल्पवयीन मुलगी ही तिच्या आईसोबत रस्त्याने पायी जात असतांना संशयित आरोपी निलेश पुंजू मालचे रा. घुमावल ता. चोपडा याने मुलीचा हात पकडून दुचाकी (एमएच १९ डीएस १६५४) वर बसविले. त्यावेळी मुलीची आई बोलण्यासाठी आली असता महिलेला मारहाण केली; व अल्पवयीन मुलीला पळून नेल्याची घटना घडली.

याबाबत पिडीत मुलीच्या आईने अडावद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी निलेश पुंजू मालचे याच्या विरोधात अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार जगदीश कोळंबे करीत आहे.

Exit mobile version