Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातून गर्भवती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी २२ फेब्रुवारी रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावात राहाारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या नातेवाईकांसह वास्तव्याला आहे. १५ नोव्हेबर ते १० नोव्हेबर २०२१ दरम्यान अल्पवयीन मुलाने पीडीत मुलीशी जवळीक साधुन दोन वेळा अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीत मुलगी गर्भवती राहीली. मंगळवारी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी पडित मुलीच्या पोटात दुखायला लागले तेव्हा तिच्या पालकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी आणले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. पीडीत मुलीला नातेवाईकांनी विश्वासात घेवून विचारपूस केली असता आपल्यावर मुलाचे नाव सांगून त्याने दोन वेळा अत्याचार केल्याचे सांगितले. पीडीत मुलीच्या नातेईकांना पिडीतेसह एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून रात्री ९ वाजता तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून  पोक्सो कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे करीत आहे.

 

Exit mobile version