Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यापीठात १६ मार्च रोजी होणार माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशाळांमधील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शनिवार दि.१६ मार्च रोजी विद्यापीठात आयोजित करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ माजी विद्यार्थी संघटनेतर्फे शनिवारी, सकाळी ११ वाजता अधिसभा सभागृहात हा मेळावा होणार असून कुलगुरू प्रा. व्ही.एल.माहेश्वरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे तसेच विद्यापीठातील शिक्षक व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठ प्रशाळेतील माजी विद्यार्थी या मेळाव्यासाठी नोंदणी करु शकतात. दुपारच्या सत्रात त्या त्या प्रशाळेत माजी विद्यार्थी हे विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधतील. तसेच सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लिंक व क्यूआर कोड देण्यात आला असून त्याद्वारे माजी विद्यार्थ्यांना नोंदणी करून उपस्थित राहता येईल अशी माहीती माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. भुषण चौधरी यांनी दिली.

Exit mobile version