Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डंपर मागे घेतांना झाडाच्यामध्ये दाबला गेल्याने मेकॅनिक गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील ॲटोनगरात डंपर मागे घेत असतांना २८ वर्षीय मॅकेनिकल हा डंपर आणि झाडाच्या मध्ये दाबला गेल्याने छातीच्या बरगड्या, खांद्याचे हाड तुटून तो गंभीर जखमी झाल्याची घडली. याप्रकरणी रविवारी मध्यरात्री डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक सदाशिव खजुरे (२८, रा. तानाजी मालुसरे नगर) असे जखमी झालेल्या मॅकनिकलचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगा शहरातील तानाजी मालसुरे नगरात दीपक खजुरे हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. तो जळगाव-भुसावळ रस्त्यावरील ॲटोनगरमध्ये एका गॅरेजवर काम करतो. शनिवारी १६ मार्च रोजी गॅरेज मालक व दिपक हा तरुण काम करत असताना गॅरेजसमोरून एक जण डंपर (क्र. एमएच १९, सीएक्स ०३४१) मागे घेत होता. त्यावेळी डंपरच्या मागे उभा असलेला दीपक हा तरुण डंपर व झाडाच्यामध्ये दाबला गेला. त्यामुळे त्याच्या छातीच्या बरगड्या तसेच खांद्याचेही हाड तुटले आहे. या घटनेनंतर डंपर चालक तेथून निघून गेला. जखमी तरुणाला गॅरेज मालक व इतर नागरिकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी रविवारी १७ मार्च रोजी मध्यरात्री १२.३० वाजता दीपक खजुरे याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version