Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल शहरात धारदार चाकू बाळगणाऱ्यास अटक

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील बुरुज चौकात बेकायदेशीररित्या धारदार चाकू घेऊन फिरणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाला यावल पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातील धारदार चाकू हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

यावल पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावल शहरातील बुरुज चौकात रविवार १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास एक तरुण हातात लोखंडी धारदार चाकू घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळाली. त्यानुसार यावल पोलिसांनी कारवाई करत संशयित आरोपी देवानंद बाळू सपकाळे (वय ३५) रा. किल्ला झोपडपट्टी शिवाजी नगर, यावल याला ताब्यात घेतले. त्याच्या जवळ असलेला धारदार चाकू हस्तगत केला आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता पोलीस हेडकॉन्स्टेबल सुशील घुगे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी देवानंद सपकाळे यांच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहे.

 

Exit mobile version