Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सावदा शहरातून निघाली भव्य वृक्ष दिंडी !

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या सांगता सोहळ्यानिमित्त शहरातून भव्य वृक्ष दिंडी काढण्यात आली.

 

सावदा शहरात  नगरपालिकेच्या वतीने व श्री आ. म. हायस्कूल व ना. गो. पाटील जुनियर कॉलेज सावदा त्याचप्रमाणे नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिर सावदा यांच्या संयुक्त विद्यमाने सावदा शहरांमध्ये विशाल अशा वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले. या वृक्षदिंडीमध्ये श्री आगम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनी महाराष्ट्रीयन वेशभूषा व फेटे परिधान करून दिंडीच्या स्वरूपामध्ये रोपट्यांची पालखीमध्ये मिरवणूक काढून भव्य शोभायात्रा काढली.

 

त्याचप्रमाणे एनसीसीचे विद्यार्थी  व तिन्ही विद्यालयाची विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावदा श्री आ म हायस्कूल सावदा येथून  वृक्षदिंडीची सुरुवात केली.  त्यानंतर ही रॅली  बस स्टॉप वरील बनाना सिटी या शिल्पाला वळसा घालून इंदिरा गांधी चौकात येऊन त्यानंतर सुगंगा नगर येथील ओपन स्पेस मध्ये ही वृक्षदिंडी वृक्ष घेऊन तिथपर्यंत पोहोचली.

 

या  ठिकाणी माजी नगराध्यक्ष राजेंद्र श्रीकांत चौधरी, माजी नगरसेविका नंदाताई लोखंडे, रंजना जितेंद्र भारंबे, लीना चौधरी, मुख्याध्यापक सपकाळे, मुख्याध्यापिका श्रीमती पुष्प लता ठोंबरे, पर्यवेक्षक देवी तायडे, पर्यवेक्षक पी.जी. भालेराव कलाध्यापक नंदू पाटील एनसीसी ऑफिसर एस. एम. महाजन,  आर्यन जावळे, अनिल नेमाडे,  ए.सी. राठोड, श्रीमती कल्पना शिरसाठ, भारती महाजन, प्रणाली काटे, संध्या चौधरी, निलेश चौधरी, सचिन सकळकळे, निर्मला बेंडाळे, राधा राणी महाजन, आरती बढे, नगरपालिकेचे विशाल पाटील,गवळे, हमीद बुरान तडवी, सतीश पाटील व अन्य नगरपालिकेचे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते या सर्वांनी एकत्रित येऊन अमृत वाटिका या नावाने त्या परिसरामध्ये फळांचे वृक्ष लावून एका नवीन प्रकल्पास सुरुवात केली व पर्यावरणास हातभार लावला.

Exit mobile version