Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या पतीस जन्मठेप

WhatsApp Image 2019 03 29 at 19.47.54

भुसावळ प्रतिनिधी । येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु असलेल्या पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत घरात गळा आवळून खुन करुन तीचे अंगावरील दागीने चोरुन घेतल्या प्रकरणी पतीस भुसावळ जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश एस.पी.डोरले यांनी आज सक्त मजुरीच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

 

या प्रकरणातील तालुक्यातील साकरी येथील इंदिरा नगरमधील आरोपी महेंद्र रामपाल हरिजन हा पत्नी आम्रपाली व लहान मुलांसह राहत होता. त्याच परीसरात आम्रपालीच्या आईचे सुद्धा घर आहे. मात्र ती कामधंदयानिमीत्त, तीचे कुटुंबीयासोबत मिरा रोड मुंबई येथे राहत होती. १७ नोव्हेंबर २०१५ रोजी घटनेच्या रात्री आम्रपालीचे आई व इतर नातेवाईक हे साकरी येथे आलेले असताना आम्रपालीच्या पतीला तीच्या चारीत्र्यावर संशय घेतल्याने वाद झाला व नंतर ते दोघे आपल्या घरी जाऊन झोपले. सकाळी आम्रपालीची आई तीचे घरी गेली असता ती तोंडास फेस आलेल्या व गळ्यावर व्रण असलेल्या अवस्थेत मृत आढळून आली. त्यामुळे तीची आई संगीता जाधव यांनी अगोदर अकस्मात मृत्युची खबर भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान पोलीसांनी तपास करतांना तीच्या अंगावरील दागीने सुद्धा गायब आढळले व गळयावर लालसर आवळल्याचे निशाण दिसले. म्हणून तिच्या आईने तालुका पोलीस ठाण्यात भादवी कलम ३०२, ४०४ अन्वये आरोपी पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा न्यायालय खटला क्र. केस १४/१६ असा सुरू होता. या प्रकरणात कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता मात्र परिस्थितीजन्य पुराव्या वरून न्यायालयाने आरोपी पतीस खुन केल्याचे व मयताचे अंगावरील दागीने पळविल्याचे ग्राह्य धरून कलम ३०२ खाली सक्तमजूरीची जन्मठेप तसेच 2 हजार रुपये दंड तसेच कलम ४०४ खाली २ वर्ष सक्तमजूरी तसेच १ हजार रु.दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात दोष सिद्ध करणेसाठी सरकारतर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारतर्फे खटल्याचे कामकाज सहा सरकारी वकील अॅड.विजय खडसे तर आरोपीतर्फे अॅड.भूपेश बाविस्कर यांनी काम पाहीले.

Exit mobile version