Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उमाळे येथील उमा-महेश्वराचे जागृत देवस्थान ! (व्हिडीओ)

umale mandir

 

जळगाव प्रतिनिधी । जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील उमाळे या गावातील उमा-महेश्वराचे शिवमंदीर आहे. अखेर श्रावण सोमवार निमित्त आज दि. 26 ऑगस्ट रोजी या शिवमंदिरात उमा-महेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे.

जळगाव पासून उमाळे हे गाव 14 किमी अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी दिवसभर भरपुर बससेवा उपलब्ध आहे. उमा-महेश्वराचे शिवमंदीर जागृत स्थान असून खान्देश वासियांचे श्रध्दास्थान आहे. हे देवस्थान महामार्गापासून अर्धा किमी अंतरावर आहे.

मंदिराचे वैशिष्ट
हजारो वर्षापूर्वी भगवान शंकर यांनी या भागात वास्तव्य केले होते. यावेळी त्यांनी पिंडाला आकार दिला असून आज ही वैशिष्टपुर्ण आकाराची पिंड उमा-महेश्वराची पिंड म्हणून ओळखली जाते. उमा म्हणजेच माता पार्वती व महेश्वर म्हणजेच भगवान शंकर असा याचा अर्थ आहे. ही पिंड एका ग्रामस्थाला आढळली. तेव्हापासून त्यांनी पिंडीची पुजा-अर्चना करण्यास प्रारंभ केला. या जागृत देवस्थानाच्या पुर्वे इतिहासाबाबत गावात कोणाला फारशी माहिती नाही, तरी देखील एक जागृत देवस्थान म्हणून उमा महेश्वर देवस्थान प्रसिध्द आहे. उमा महेश्वराच्या पिंडीजवळच दोन मोठे वडाचे वृक्ष आहेत. तसेच कडूनिंब व चिंच यांचेही वृक्ष आहेत. वडाचे वृक्ष हजार वर्षापूर्वीचे असल्याचे दिसून येते. या वृक्षांमुळे देवस्थान परिसर अतिशय रम्य झाला आहे. अलिकडेच मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला असून, या भव्य मंदिराच्या देखभालीसाठी विश्वस्त मंडळ स्थापले आहे.

संस्थेच्या विश्वस्त मंडळात बाजीराव पाटील, शिवाजी पाटील, डॉ. अविनाश आचार्य यांचा समावेश आहे. वे.शा.सं. कै.देविदास कालिदास धर्माधिकारी यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव वे.शा.सं गिरीश धर्माधिकारी व प्रथमेश धर्माधिकारी तसेच आदीजण या मंदिराची देखभाल करत असतात.

Exit mobile version