Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घोडबंदर किल्ल्यात आढळली आली छुपी खोली

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरणाच्या कामादरम्यान तळघरात छुपी खोली आढळून आली आहे.यामुळे शनिवारी पुरातत्व विभागाकडून किल्ल्याला भेट देऊन तपासणी करण्यात आली.

मिरा-भाईंदर शहरात ऐतिहासिक असा घोडबंदर किल्ला आहे.हा किल्ला पुरातत्व विभागाकडे नोंदणी कृत आहे.परंतु मागील अनेक वर्षांपासून किल्याची पदझड मोठ्या प्रमाणात होऊ लागली होती.म्हणून पालिकेने राज्य शासनाकडे घोडबंदर किल्ला ‘महाराष्ट्र वैभव- राज्य संरक्षित स्मारक योजने’ अंतर्गत संगोपनार्थ देण्याची मागणी केली होती.त्याला शासनाने २०१९ साली मंजुरी दिली होती.तदनंतर किल्ल्याचा विकास आराखडा तयार करत, पुरातत्त्व विभागाच्या मदतीने किल्ल्याच्या संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे.यात किल्याच्या बांधणीचे काम पूर्ण झाले असून अवती-भवती असलेल्या परिसराचा विकास केला जात आहे.दरम्यान किल्ल्याच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळ कमानीसाठी खोदकाम सुरु असताना काही विलक्षण भिंती असलेले तळघर कामगारांना दिसून आले होते.त्यावरून स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती राज्य पुरातत्त्व विभागाला दिली होती.सुरुवातीला ही एक भुयार असल्याचे म्हटले जात होते.

मात्र शनिवारी पुरातत्व विभागातील तज्ञांनी किल्ल्याला भेट देऊन ही छुपी खोली असल्याचे स्पष्ट केले आहे.तर यावरून किल्ला परिसरात असलेल्या इतर वास्तूचा शोध घेतला जात असल्याची माहिती पुरातत्व शास्त्रज्ञांकडून देण्यात आली आहे.घोडबंदर किल्यातील तळघरात आढळून आलेली खोली ही जवळपास तीन बाय तीन (३×३)फुटाची आहे.यात दिवा ठेवण्यासाठी स्वतंत्र दगडाची खण बनवण्यात आली आहे. प्रामुख्याने या खोलीचा वापर अडचणीच्या प्रसंगी स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी केला जात असल्याचा अंदाज आहे.तर अशा अजून काही खोल्या दिसून येण्याची शक्यता असल्यामुळे येत्या दिवसात मातीचे उत्खनन केले जाणार असल्याचे पुरातत्व शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

Exit mobile version