Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चक्रीवादळाच्या संकटात सापडलेल्या ओझर वासियांना मदतीचा हात

जामनेर प्रतिनिधी । चक्रीवादळाने तालुक्यातील ओझर येथे अनेकांची घरे उद्ध्वस्त केली. प्रशासनाच्या मदतीची वाट पाहत असताना सेवाभावी व्यक्तीमत्व कचरूलाल बोहरा यांनी जीवनावश्यक वस्तू पुरवल्या तर प्रहार जनशक्ती पक्षाने किराणा किटचे वितरण सुरू केले.

त्याच बरोबर प्रहार जनशक्ती पक्षाने किराणा किटचे वाटप करून मदतीचा प्रारंभ केला. तर बोहरा परिवाराने ही मदतीचा हातभार लावून किराणा किट दिले. तरीही ही मदत अपुरी पडत असल्याने कचरूलाल बोहरा यांचे मन अस्वस्थ होते. त्यांनी लागलीच सेवाभावी संस्था यांच्याशी आपला संपर्क सुरु ठेवला होता अशातच इंडियन रेड क्रॉस सोसायटी जळगाव युनिटचे पूर्ण कोरोना काळातील मदत कार्य त्यांना माहित होते त्यांनी मदतीची भावना व्यक्त केली असता इंडियन रेड क्रॉस सोसायटीने मदतीचा हात पुढे केला. इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे पदसिध्द अध्यक्ष जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे मार्गदर्शनाखाली दानशूर व्यक्तीकडून देणगी घेऊन अत्यावश्यक १८ वस्तूंचे किट तयार करुन ७५ कुटुंबांना ते देण्यात आले. या सोबतच गर्भवती महिला, लहान बालके व इतर नागरिकांसाठी रूप्रकोस कंपनीचे रोगप्रतिकार शक्ती वाढविणारी औषधे, प्रोटीन पावडर, रक्त वाढीचे ची औषधे तालुका आरोग्य अधिकारी राजेश सोनवणे यांच्या सल्ल्याने देण्यात आली.

यावेळी रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन,  मानद सचिव विनोद बियाणी, रक्तपेढी चेअरमन डॉक्टर प्रसन्नकुमार रेदासनी, आपत्ती व्यवस्थापन समिती चेअरमन सुभाष साखला, जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा यांच्या हातून वाटप करण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदीप गायके, विकास महाजन, साहेबराव खैवाडे, रंगनाथ महाजन, बाळू पाटील, गोविंद पाटील, गणेश महाजन, राजू महाजन उपस्थित होते.

 

Exit mobile version