Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल महाविद्यालयातर्फे भव्य तिरंगा रॅली संपन्न

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व यावल पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ‘हर घर झेंडा’ जनजागृतीच्या निमित्ताने तिरंगा रॅली संपन्न झाली.

भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासन, उच्च शिक्षण विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या निर्देशानुसार रॅलीचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग यांच्यासह सहयोगाने व  यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाने रॅली संपन्न झाली.

यावल पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक सौ. सुनीता कोळपकर व प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी रॅलीस हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. रॅली महाविद्यालय प्रवेशद्वारापासून फैजपुर रोड, बस स्टॅन्ड, यावल पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, स्टेट बँक मार्गे नवीन तहसील कार्यालयापर्यंत घेण्यात आली. नवीन तहसील कार्यालय ठिकाणी समारोप करण्यात आला.

दि. १३ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २o२२ पर्यंत प्रत्येकाने आपापल्या घरावर राष्ट्रध्वज लावावा यावेळी प्रत्येकाने ध्वज संहितेचे नियम पाडावेत राष्ट्रीय ध्वजाचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनवणे यांनी केले. रॅली समारोपप्रसंगी नायब तहसीलदार संतोष विनंते यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा अभियानाची माहिती देऊन महोत्सव नियमात व उत्साहात साजरा  करा असे सांगितले. रॅलीत भारत माता की, जय वंदे मातरम आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. सदर रॅली प्रसंगी उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, प्रा. संजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक  सुदाम काकडे उपस्थित होते.

सदर रॅलीचे सूत्रसंचालन उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ.आर. डी. पवार यांनी मानले. या रॅलीसाठी विद्यार्थी विभाग विकास विभाग प्रमुख डॉ. एस.पी. कापडे,डॉ एच जी भंगाळे, डॉ पी व्ही पावरा, अरुण सोनवणे, संजीव कदम, मिलिंद बोरघडे, प्रमोद कदम,संतोष ठाकूर, अनिल पाटील,प्रमोद जोहरे, अमृत पाटील, प्रमोद भोईटे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version