Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बबलू पिपरिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भव्य रक्तदान शिबिराचे उद्या आयोजन

जळगाव प्रतिनिधी । येथील दिवंगत सामाजिक कार्यकर्ते बबलू (हर्षित) पिपरिया यांच्या स्मृतीनिमित्त योगवर्ग, समस्त मित्र परिवार व इंडियन रेडकक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन उद्या दि.10 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 2 करण्यात आले आहे.  

सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे बबलू पिंपरिया यांनी आपल्या दातृत्वाचा मोठा ठसा आपल्या हयातीत उमटविला असून त्याच्या स्मूतीप्रीत्यर्थ सामाजिक जाणिवेचे भान ठेवून गरजू रुग्णांना योग्य वेळेत रक्त पुरवठा उपलब्ध होण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. गाईसाठी पाण्याच्या हौदाचे अनावरण देखील यावेळी करण्यात येणार आहे. 

राज्यात एक दिवसाचा पुरेल इतकाच रक्त साठा शिल्लक असताना आरोग्य यंत्रणेवर कोविडच्या पार्श्वभूमीवर मोठे संकट येऊन ठेपले असून राज्यात रक्त तुटवडा निर्माण झाला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे वेळोवेळी राज्यात रक्तदान करण्याचे आवाहन करीत असून नागरिकांनी समाजकार्यात स्वयंपुर्ती पुढे यावे असे देखील आवाहन करण्यात आले आहे. 

रक्तदान शिबिराचे आयोजन गुरुवारी 10 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 2  यावेळेत होणार असून हर्षित अँड कंपनी ,172 ,विसनजी नगर ,ज्ञान योगवर्ग हॉल ,पप्पू पेपर किंगच्या बाजूला जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे.

 

Exit mobile version