Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राम मंदिरात लागला सोन्याचा दरवाजा

अयोध्या-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राम मंदिर सोहळ्याचा दिवस जसा जवळ येतोय तसा लोकांमध्ये उत्साह वाढत आहे. अयोध्येतील लोकांसाठी तर हा दिवाळीचाच सण आहेत. अशात राम मंदिराच्या निर्मितीबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. अयोध्येतील राम मंदिराला लागणाऱ्या सोन्याच्या दरवाजाचा पहिला फोटो समोर आला आहे. या दरवाज्यावर सुंदर अशी कलाकुसर करण्यात आली आहे.
माहितीनुसार, दरवाजा १२ फूट उंच आणि ८ फूट लांब आहे.
या दरवाज्याला पहिल्या मजल्यावर लावण्यात आले आहे. राम मंदिराला एकूण ४६ दरवाजे असणार आहेत. ज्यातील ४२ दरवाज्यांवर १०० किलो वजनाचा सोन्याचा स्तर चढवला जाणार आहे. पायऱ्यांच्या जवळ असणाऱ्या चार दरवाज्यांना सोने लावले जाणार नाही. येत्या तीन दिवसात अशाच प्रकारे आणखी १३ दरवाज्यांवर सोने लावले जाईल.
राम मंदिराच्या सोन्याच्या दरवाजाचे फोटो समोर आलेत. यामध्ये दिसतंय की, मध्यभागी दोन हत्ती आहेत. लोकांचे स्वागत करणारे हे हत्ती आहे. दरवाजाच्या वरच्या भागात राजवाड्यासारखी आकृती दिसत आहे. याठिकाणी नोकरवर्ग हात जोडून उभा आहे. दरवाजाच्या तळाच्या भागात सुंदर कलाकुसर करण्यात आलीये.या दरवाज्यासाठी वापरण्यात आलेले लाकूड महाराष्ट्रातून मागवण्यात आले होते. दरवाजा कन्याकुमारीच्या कलाकारांनी घडवला आहे. १००० वर्षांपर्यंत हे दरवाजे खराब होणार नाहीत असं सांगितलं जातं.

Exit mobile version