Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बसमध्ये चढतांना महिलेच्या पर्समधून सोन्याची मिनी मंगलपोल लांबविली

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर बसस्थानकाच्या आवारात बसमध्ये चढत असताना महिलेच्या पर्समधून १२ हजार रुपये किमतीची सोन्याची मिनी मंगलपोत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडल्याचे समोर आले. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, छाया किशोर शिसोदे (वय-५०, रा. डांगरी ता.अमळनेर ह.मु. दादावाडी जळगाव) या महिला कुटुंबासह वास्तव्याला आहे. कामाच्या निमित्ताने महिला मुळ गावी डांगरी येथे आलेल्या होत्या. त्यानंतर शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजता जळगावला येण्यासाठी त्या अमळनेर बसस्थानकात आल्या. त्यावेळी नंदुरबार ते जळगाव या बसमध्ये चढत असताना त्यांच्या जवळील कापडी पिशवीतून अज्ञात चोरट्याने १२ हजार रुपये किमतीची सोन्याची मिनी मंगलपोत चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली. परंतु सोन्याची मंगलपोत मिळाली नाही, त्यामुळे त्यांनी सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील हे करीत आहेत.

Exit mobile version