Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

साहित्य संमेलनात दिसले महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृहात आज लोककला, लोकसंगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर झाला. खच्चुन भरलेल्या सभागृहात कलावंतांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवत उपस्थितांची मने जिंकली.

नगरदेवळा येथील खान्देश शाहीर शिवाजीराव पाटील यांनी सादर केलेल्या पोवड्याने उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले. बापूसाहेब हटकर यांनी कर्ण जल्मानी कहाणी सादर केली. विनोद ढगे यांनी वही गायन सादर केले. प्रविण पवार यांनी केलेल्या संबंळ नृत्याने सभागृह उत्सहाने भरुन गेले होते. खान्देशी पोवडा म्हणून प्रसिद्ध असलेला टिंगरीवाला भिका भराडी यांनी जोशात सादर केली. खान्देशी लोकगीतात वसुंधरा यांनी हळद कूटन कूटा वं कूटा वं खांड…, पायतं, तेलन, पोखान, खेसर, देव वरन म्हणजेच देव नाचवणं व आखाजी नं गीत आथानी कैरी तथानी कैरी व गौराई गीत गायली. यावर मृणाल धनगर यांनी नृत्य सादर केले.

यासोबतच जागरण, गोंधळ, गोंधय धोंडी गीत परशुराम सुर्यवंशी यांनी सादर केली. वन्हे विकास राजपूत यांनी सादर केले. शेषराव गोपाळ व सुनंदा कोचुरे यांनी तामाशातील गण व गवळण सादर करुन रंगत आणली.
ृमुंबईचे बापू हटकर व गिरडचे रमेश धनगर याचे संयोजक होते.

Exit mobile version