Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरुणाच्या डोक्यात टाकली काचेची बाटली

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील बी.जे. मार्केट जवळील रेडक्रॉस सोसायटीसमोर मागील भांडणाच्या कारणावरून तरुणाच्या डोक्यात काचेची बाटली मारून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हापेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश उर्फ बाळा खंडू बनसोडे (वय-२७) राहणार महावीर नगर, दूध फेडरेशन जळगाव हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. खाजगी हॉस्पिटल येथे डॉक्टर म्हणून नोकरीला आहे. मंगळवार २८ जून रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास अविनाश बनसोडे हा शहरातील बी.जे. मार्केट जवळील रेडक्रॉस सोसायटीसमोर कामाच्या निमित्ताने आलेला होता. दरम्यान मागील भांडणाच्या कारणावरून राजेश विनोद बनसोडे व त्याच्या सोबत असलेले त्याचे तीन अनोळखी मित्र यांनी शिवीगाळ करून काचेची बाटली डोक्यात मारली आणि फायटरने डोळ्यावर वार करून गंभीर दुखापत केली. बुधवार २९ जून रोजी दुपारी साडेतीन वाजता राजेश बनसोडे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून राजेश विनोद बनसोडे आणि त्याच्या सोबत असलेले त्याचे तीन मित्र यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप पाटील करीत आहे.

 

Exit mobile version