Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रवाशाचा मोबाईल लांबविणाऱ्या फरार चोरट्याला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील नवीन बसस्थानक परिसरात तरूणाचा मोबाईल लांबविल्याची प्रकरणात दाखल गुन्ह्यात फरार झालेल्या चोरट्याला जिल्हापेठ पोलीसांनी बसस्थानक आवारातून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत केला असून  जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जिल्हापेठ पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, गोकुळे सुभाष घाटे (वय-२९) रा. जामनेर हे कामानिमित्त मंगळवार ८ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता जळगाव शहरातील नवीन बसस्थानकात आले होते. त्यावेळी त्यांच्याजवळील मोबाईल चोरट्याने चोरून नेला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे शोध पथकानी पोहेकॉ सलिम तडवी, रविंद्र साबळे, तुषार  पाटील, कैलास शिंदे, जयेश मोरे यांनी गुरूवारी १० ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता नवीन बसस्थानक आवारातून संशयित आरोपी साजिद खान मुन्नवर खान (वय-४४) रा. मालेगाव. जि.जळगाव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १० हजार रूपये किंमतीचा चोरीचा मोबाईल हस्तगत केला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक कमलेश पवार करीत आहे.

Exit mobile version