Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खूनाच्या गुन्ह्यामध्ये फरार संशयीताला अटक !

जळगाव-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल खूनाच्या गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या संशयीताला गुरुवार 22 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेने जळगाव तालुक्यातील असोदा येथून अटक केली आहे. नरेंद्र उर्फ भुऱ्या उर्फ भद्रा पंडित सोनवणे वय 31रा.आसोदा, जळगाव असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये फरार असलेला संशयित नरेंद्र उर्फ भुऱ्या हा त्याच्या गावात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजनराव पाटील यांना मिळाली. त्यानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल विजयसिंह पाटील सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, जितेंद्र पाटील ,प्रीतम पाटील, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे ,राहुल पाटील ,सचिन महाजन यांच्या पथकाने गुरुवारी २२ डिसेंबर रोजी दुपारी संशयित नरेंद्र उर्फ भूऱ्या यास त्याच्या आसोदा गावातूनच अटक केली. त्याला पुढील कारवाईसाठी जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Exit mobile version