Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पत्नीसोबत फोनवर बोलल्याने मित्राची केली हत्या

मुंबई- लाईव्ह ट्रेंडस न्यूज  वृत्तसेवा  । भिवंडीत पत्नीसोबत फोनवर बोलत असल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीने त्याच्या मित्राची हत्या केली. त्यानंतर तो उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या त्याच्या पत्नीलाही मारायला निघाला, पण पोलिसांनी त्याला अटक केली. सुरेंद्र कन्हैय्यालाल सोनकर, वय 40 वर्षे, रा. कामतघर  असं आरोपीचं नाव असून भिवंडी पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेशमधून अटक केली.

सविस्तर वृत्त असे की, भिवंडीत अंजुरफाटा रेल्वे स्टेशन रोड येथील निर्जन ठिकाणी झाडाला एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह लटकावलेला आढळून आला होता. त्याबाबत नारपोली पोलीस ठाणे येथे अज्ञाताच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना मयत इसमाची ओळख पटली. सद्दाम इसहाक हुसेन कुरेशी, वय 19 वर्षे, रा. कामतघर, असे मयत तरुणाचे नाव आहे.

Exit mobile version