Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जुन्या वादातून तरूणाच्या डोक्यात टाकली फरशी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील न्यु सम्राट कॉलनी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरुन व्यापारी तरुणाच्या डोक्यात फरशी टाकून त्याला जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी गुरुवार १० ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून सहा मिनिटांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव शहरातील न्यु सम्राट कॉलनी येथे रोशन ऊर्फ बबलू हिरालाल धनगर वय २२ वास्तव्यास आहेत. बुधवार, ९ ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास रोशन हा मेडीकलवरुन गोळ्या घेवून येत असतांना, जुन्या भांडणाच्या कारणावरुन धिरज दत्ताऋय हिरवाळे, नेहा दत्तात्रय हिरवाळे व रत्ना दत्तात्रय हिरवाळे सर्व रा. न्यु सम्राट कॉलनी या तिघांनी शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी रोशन याला तसेच त्याच्या आईलाही मारहाण केली. याचदरम्यान धीरज याने मागून येवून रोशन याच्या डोक्यात फरशी दाखून त्याला दुखापत केली, याप्रकरणी जखमी रोशन याने दुसऱ्या दिवशी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गाठून तक्रार केली. या तक्रारीवरुन धिरज दत्ताऋय हिरवाळे, नेहा दत्तात्रय हिरवाळे व रत्ना दत्तात्रय हिरवाळे सर्व रा. न्यु सम्राट कॉलनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले हे करीत आहेत.

Exit mobile version