Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शॉर्टसर्कीटमुळे पाथरी शिवारातील शेतात आग; एक लाखाचे नुकसान

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पाथरी शिवारात शेतात वादळामुळे इलेक्ट्रीक तारांमुळे शॉर्टसर्किट होवून आग लागून नकेळी पिकाच्या झाडांसह ठिबक सिंचनच्या नाळ्या, व पीव्हीस पाईप असे एकूण १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील पाथरी शिवारात गट नं १८१ याठिकाणी  तुकाराम गंगाराम पाटील यांचे मालकीचे असलेल्या शेतात केळी पिकाची बाग लागवड करण्यात आली आहे. ३० एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अचानकपणे वारावादळ सुरु झाले. यात शेतातून गेलेल्या वीजतारा एकमेकांना स्पर्श होवून शॉर्टसर्किट होवून यात शेताला आग आगली. या आगीत शेतातील केळाच्या झाडासंह  शेतात ठेवलेल्या ठिबकच्या नळ्या, पीव्हीसी पाईप असे एकूण १ लाख रुपये किंमतीचे साहित्य जळून खाक झाले. याप्रकरणी प्रकाश भास्कर पाटील वय ३४ रा. पाथरी ता. जळगाव यांच्या खबरीवरुन १ मे रोजी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सचिन देशमुख हे करीत आहेत.

Exit mobile version