Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मारुळ येथील जीर्ण पाण्याची टाकी कोसळण्याच्या अवस्थेत ; प्रशासनाचे दुर्लक्ष

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मारुळ येथील ४५ वर्षांपूर्वी बांधलेल्या पाणीची टाकीचा काही भाग कोसळून टाकीच्या आत पडला आहे. यामुळे पाण्याची टाकी कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. मात्र, याकडे संबंधित विभागाकडून घेतली जात नसून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

मारूळ या गावात सुमारे (४५) वर्षांपूर्वी प्रभाग क्रमांक सहा (६) मध्येही पाण्याची टाकी ( जलकुंम) बांधण्यात आली होती ही टाकी चार दशकापुर्वीचे जलकुंभ बांधण्यात आले असुन मागील २५ वर्षापासुनही पाण्याची टाकी निकामी झाली. अशा अवस्थेत ही टाकी कुठल्याही क्षणी कोसळू शकते या टाकीच्यावरील स्लॅब हे कोसळून तो टाकीच्या आत पडलेला आहेत. टाकीच्या बांधकामातील लोखंडी सड्या उघड्या पडल्या आहेत. आजही पाण्याची टाकी जीर्ण अवस्थेत असून टाकीच्या काही भागावरील प्लास्टरचा भाग कोसळला आहे. सुदैवाने त्यावेळी पाण्याच्या टाकी खाली कोणीही नसल्यामुळे कुणासही दुखापत झाली नाही.

तसेच टाकीच्या आजुबाजुस संरक्षण कंपाऊंड नसल्याने या ठिकाणी नेहमीच नागरिकांची वर्दळ असते तसेच शाळातील ये-जा करणारे विद्यार्थी मुले मुली ही खेळत असतात या पाण्याच्या टाकी खाली दुपारच्यावेळी थोडाफार प्रमाणात थंड वातावरण असल्याने येथील अनेक नागरी याठिकाणी बसलेले दिसून येतात संबधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी व तात्काळ ही निकामी झालेली पाण्याची टाकी पाडावी व भविष्यातील संभाव्य दुर्घटना टाळावी अशी अपेक्षा मारूळच्या नागरिकांकडून होत आहे.

 

Exit mobile version