Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोस्ट ऑफिस जवळील जीर्ण भिंत कोसळली – सुदैवाने जिवितहानी नाही

पाचोरा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा पोस्ट ऑफिसजवळील जीर्ण भिंत आज अचानक कोसळल्याची घटना घडली आहे. घटना पहाटेच्या सुमारास घडल्याने सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

आज शुक्रवार, दि. ५ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास शहरातील रेल्वे स्थानकानजीक असलेल्या पोस्ट ऑफिसजवळील जीर्ण भिंत अचानक कोसळली. ही भिंत कोसळल्याने पोस्ट ऑफिसच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही भिंत कोसळल्याने सद्यस्थितीत कुठलाही अनुचित प्रकार होण्याचे नाकारता येत नाही.

पोस्ट ऑफिस आवारात कुठलाही सुरक्षा रक्षक नसल्याने चोरट्यांना आयते कोलीत मिळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पोस्ट ऑफिसचे व्यवस्थापक राजेंद्र पाटील यांनी याआधी चार वेळेस सुरक्षा रक्षक मिळावा म्हणून पोलीस अधिक्षक यांना पत्राद्वारे कळविले आहे. मात्र तरी सुद्धा पोस्ट ऑफिसला सुरक्षा रक्षक मिळत नसल्याने पुढील अनर्थाची शक्यता नाकारता येत नाही.

Exit mobile version