Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जयपूरमध्ये एका घरात सिलिंडरला आग लागल्याने संपूर्ण कुटुंब संपले

जयपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राजस्थानमधील जयपूरध्ये स्वयंपाक करताना सिलिंडरला आग लागल्याने संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले. कुटुंबातील सर्व पाच जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. ही घटना २१ मार्च गुरूवार रोजी सकाळी साडेसात वाजता जयपूरच्या जैसल्या गावात घडली आहे. त्यांच्या घराच्या दारात सिलिंडर ठेवला होता आणि तिथेच स्वयंपाक केला जात होता, त्यामुळे आतील कोणीही बाहेर पडू शकला नाही.

मिळालेल्या माहितीनूसार, या घरात राजेश (२६), त्याची पत्नी रुबी (२४), इशू (७), दिलखुश (२) आणि खुशमणी (४) यांचा मृत्यू झाला. हे कुटुंब बिहारमधील मोतिहारी या गावात राहणारे असून भाडयाने जयपूरमधील घरात भाडयाने राहत होते. राजेश एका कारखान्यात काम करायचा. गेल्या ४-५ महिन्यांपासून हे कुटुंब येथे राहत होते. काही दिवसांसाठी बिहारला गेले होते. काल संध्याकाळीच परत आले. आज सकाळी दुर्घटना घडली. घरात एक सिलिंडर जळत होते.

घटनेनंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवून जळालेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच जयपूरचे एसपी अशोक चौहान यांनी घटनेची माहिती मिळताच सकाळी ७.४० वाजता पोलिस पथक घटनास्थळी पाठवले.

एसपी अशोक चौहान म्हणाले की, आग सिलिंडरच्या रेग्युलेटरच्या पॅनलमधून बाहेर आली होती, त्यामुळे आग खोलीत पसरली. आगीपासून वाचण्यासाठी राजेश खोलीच्या कोपऱ्यात बसले, पण त्यांचाही मृत्यू झाला.शेजारी राहणाऱ्या अर्जुनने सांगितले की, राजेशने सकाळी सिलिंडर बदलला होता आणि स्वयंपाकासाठी रेग्युलेटर लावला होता. रेग्युलेटर योग्यरीत्या बसवला नसावा. त्यामुळे गळती होऊन आग लागली. काही वेळातच आग संपूर्ण खोलीत पसरली. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.

Exit mobile version