Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पिस्तुल घेऊन फिरणारा मध्यप्रदेशातील गुन्हेगार गजाआड

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील पोलिसांच्या पथकाने पिस्तुल घेऊन फिरत असलेल्या मध्यप्रदेशातील गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत.

सध्या मध्य प्रदेशचे गुन्हेगार रावेर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत आहे.असाच एक आरोपी पिस्टल व जिवंत काडतुस घेऊन रावेर शहरात महामार्गा नजिक फिरत असतांना प्रभारी पोलिस अधिकारी आशीष अडसुळ यांच्या सर्तकतेमुळे जेरबंद झाला आहे

प्रभारी पोलिस अधिकारी श्री अडसुळ यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरुन दि २२ रोजी रात्रीच्या सुमारास रावेर शहरात बर्‍हाणपुर-अंकलेश्वर महामार्गावर कल्याणी हॉटेल नजिक एक मध्य प्रदेश येथील गुन्हेगार मुजाहिद उर्फ माया ईब्राहम खान (वय २७ रा. गुलाबगंज लालबाग बर्‍हाणपुर, मध्यप्रदेश ) हा फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिस प्रशासनाने क्षणाचाही विलंब न करता मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक सचिन नवले यांनी आपल्या टीमसह संबधीत आरोपीला ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता. त्याच्या कडून १५०००/-रु किमतीचा काळसर रंगाचा,त्याचे मुठचे दोन्ही बाजुस प्लॉंस्टीकच्या लाल रंगाचा पट्टया असलेला व ठिकठिकाणी रेषा कोरलेल्या त्यास मॅगझिन असलेले पिस्तुल आढळून आले.

संबधीत आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ एम. राजकुमार व अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अशिष आडसुळ , पोउनि सचिन नवले,पोलिस कर्मचारी ईश्वर चव्हाण,सचिन घुगे,विशाल पाटील, प्रमोद पाटील,महेश मोगरे अशांनी केली आहे. पुढील तपास पोउनि सचिन नवले करीत आहे.

Exit mobile version