Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किरकोळ कारणावरून दाम्पत्याला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील खडकेचाळ येथे किरकोळ कारणावरून रिक्षाचालक तरूणासह त्याच्या पत्नीला चार जणांनी शिवीगाळ करत मारहाण करून जखमी केल्याची घटना बुधवारी ८ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी ९ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील खडकेचाळ येथे प्रविण मधुकर मराठे हे आपल्या पत्नी बेबी प्रविण मराठे यांच्यासह वास्तव्याला आहे. रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात. बुधवारी ८ नोव्हेंबर रोजी प्रविणच्या घरासमोर गल्लीतील काही अंगणात उभे राहून शिवीगाळ करत होते. याचा जाब प्रविण मराठे याने विचारल्याच्या रागातून याच परिसरात राहणारे उमेश मांडोळे, भुषण उमेश मांडोळे, देवेंद्र उमेश मांडोळे आणि किर्ती उमेश मांडोळे यांनी प्रविण मराठे याला बेदम मारहाण करून दुखापत केली. सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी प्रविणची पत्नी बेबी मराठे ही आली असता त्यांनी देखील मारहाण करून दुखापत केली. या घटनेप्रकरणी गुरूवार ९ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता जळगाव शहर पोलीसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार उमेश मांडोळे, भुषण उमेश मांडोळे, देवेंद्र उमेश मांडोळे आणि किर्ती उमेश मांडोळे सर्व रा. खडकेचाळ, जळगाव यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल मिलींद सोनवणे करीत आहे.

Exit mobile version