Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जुन्या भांडणाच्या कारणावरून दाम्पत्याला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रचना कॉलनी परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून कोयत्याने मारहाण करून दाम्पत्याला जखमी केल्याची घटना गुरुवारी सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोपाल मधुकर चौधरी (वय-४८) रा. दत्त मंदिर जवळ, रचना कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे.  मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत असतात. गुरुवार १४ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास मागील भांडणाच्या कारणावरून शेंड्या उर्फ सुनील रसाळ राठोड, अनिल रसाळ राठोड दोन्ही रा. कांचन नगर, तांडव उर्फ विशाल पदमसिंह परदेशी रा. कुसुंबा ता.जि. जळगाव आणि एक अनोळखी असे चार जण येऊन कोयत्याने मारहाण करून गोपाल चौधरी याला दुखापत केली. तर त्यांच्या पत्नी यांना मारहाण करून घरातील सामानांची नासधुक करत दुचाकीचेही नुकसान केले.

तसेच चौघांनी जीवेठार मारण्याची धमकीही दिली. हा प्रकार घडल्यानंतर जखमी गोपाल चौधरी यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या संदर्भात गोपाल चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले करीत आहे.

 

Exit mobile version