Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रस्त्यावर अचानक तब्बेत बिडल्याने बांधकाम व्यावसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मेहरूण परिसरात बांधकामाच्या ठिकाणी जात असतांना अचानक तब्बेत बिघडल्याने एका बांधकाम व्यावसायिकाचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कृष्णा निवृत्ती शिंपी (वय-५७) रा.आयोध्या नगर,जळगाव असे मयत झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे.

नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, कृष्णा शिंपी हे आपल्या परिवारासह अयोध्या नगरात वास्तव्याला होते. बांधकाम व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे शनिवारी ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता ते मेहरूण येथील बांधकामाच्या ठिकाणी असतांना त्यांची जात अचाकन तब्बेत बिघडली. त्यामुळे बांधकामाच्या ठिकाणी काम करणारे कामगारांनी त्यांना तातडीने खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांची प्राणज्योत मालविली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.

Exit mobile version