Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्ताईनगरात बंद घर फोडले; दोन लाखाचा मुद्देमाल लांबविला

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मुक्ताईनगर परिसरात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील सोन्याचे, चांदीचे दागिने व लॉपटॉप असा एकुण २ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, प्रणय प्रदीप भारंबे (वय-३१) रा. मुक्ताईनगर जळगाव हे कुटुंबियासह राहतात. २५ ऑक्टोबर रोजी ते कामाच्या निमित्ताने घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. त्यावेळी प्रणय भारंबे यांनी त्यांच्या मावसभावाला घराकडे लक्ष देण्याचे सांगितले होते.  २६ ऑक्टोबर रोजी गणेश कॉलनीतील मावसभावाने रात्री १० वाजेपर्यंत घराकडे फेरी मारली होती. त्यावेळी सर्व व्यवस्थित होते. गुरूवारी २८ ऑक्टोबर रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरात ठेवलेले ४ तोळे सोन्याचे दागिने, २ भार वजनाचे चांदी आणि डेल कंपनीचा लॅपटॉप असा एकुण २ लाख २ हजार रूपयं किंमतीचा चोरून नेल्याचे उघडकीला आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलीसांनी धाव घेतली. याप्रकरणी गुरूवारी २८ ऑक्टोबर रोजी रात्री उशीरा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जिल्हा पेठ पोलीस कर्मचारी करीत आहे.

Exit mobile version