Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुस्लिम कॉलनीतील बंद घर फोडून मुद्देमाल लांबविला

 

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्युज । भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनी परिसरात मध्यरात्री अज्ञात चोरट्याने बंद घर फोडून घरातून रोख रकमेसह सोन्याचे मनी असा एकूण २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी शुक्रवारी ४ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चिरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सय्यद वाहीम सय्यद रशीद (वय-४४, रा. मुस्लिम कॉलनी, जुनी पाण्याची टाकीजवळ भुसावळ) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २ ऑगस्ट सायंकाळी ५ ते ३ ऑगस्ट रात्री १० वाजेच्या सुमारास ते कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेले होते. त्यावेळी त्यांचे घर बंद होते, अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचा संधी साधत घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत २० हजार रुपयांची रोकड व ३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनी असा एकूण २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार घडल्यानंतर सय्यद वहीम सय्यद रशीद हे घरी आले. त्यांनी घरात प्रवेश केली असता घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार शुक्रवार ४ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय नेरकर करीत आहे.

Exit mobile version