Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दोन गटात तुंबळ हाणामारी; परस्पर विरोधात आठ जणांवर गुन्हे दाखल

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी | वरणगाव शहरातील सिध्देश्वर नगरात किरकोळ कारणावरून दोन कुटुंबात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडले आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात एकुण ८ जणांविरोधात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

वरणगाव पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की, वरणगाव शहरातील सिद्धेश्वर नगरात किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात एकमेकांना शिवीगाळ, दमदाटी करत चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. दरम्यान, या घटनेतील पहिल्या गटातील किरण किसन पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कैलास रघुनाथ साबळे, रघुनाथ भिकारी साबळे, लताबाई रघुनाथ साबळे आणि भरत साबळे या चौघांवर वरणगाव पोलीस ठाण्यात शुक्रवार १५ मार्च रोजी रात्री २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसऱ्या गटातील कैलास रघुनाथ साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किरण किसन पवार, भुरा पवार, विशाल सपकाळे आणि सोनीबाई यवतमाळ सर्व रा.सिद्धेश्वर नगर, जळगाव या चार विरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात शुक्रवार १५ मार्च रोजी रात्री २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही घटनेचा या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सहाय्यक फौजदार नागेंद्र तायडे हे करीत आहेत.

Exit mobile version