Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कानळदा रोडवर अपघातप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील कानळदा रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या घटनेप्रकरणी मंगळवार ८ मार्च रोजी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील राजाराम नगर  येथील रहिवासी हंसराज श्रीराम बिऱ्हाडे  वय ३० हे मजुरी काम करतात. १ मार्च रोजी ते त्यांच्या एम.एच.१९ सी.एल ६९१५ या क्रमांकाच्या दुचाकीने कामानिमित्ताने चोपड्याकडे गेले होते. तेथून परतत असताना  कानळदा रोडवर कुवारखेडा फाट्याजवळ  अज्ञात वाहनाने बिऱ्हाडे यांच्या दुचाकीला धडक दिली. यात बिऱ्हाडे यांना गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी मंगळवार ८ मार्च रोजी हंसराज यांचे भाऊ धनराज श्रीराम बिऱ्हाडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलिस नाईक सुशील पाटील करीत आहेत

 

Exit mobile version