Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

“त्या” अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणावर तालुका पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील कोल्हेनगर परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जेवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाविरोधात शुक्रवारी १४ जुलै रोजी रात्री ११ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कोल्हे हिल्स परिसरातील एका भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवार १४ जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घरी कोणीही नसताना त्या ठिकाणी संशयित आरोपी भारत सुभाष सूर्यवंशी (वय-३४) रा. चंदूअण्णा नगर, जळगाव हा तरुण दुचाकीने त्या ठिकाणी आला. त्यावेळी पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिची ६ वर्षाची बहीण घरी असताना संशयित आरोपी भरत सूर्यवंशी हा तिच्या घरात जाऊन तिच्याशी अश्लील लज्जा उत्पन्न करत तिचे कपडे फाडले, तसेच गालावर चावा घेत तिच्याशी अश्लील कृत्य केले. हा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलीच्या लहान बहिणीने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन त्याला रंगेहात पकडले. दरम्यान हा प्रकार कुणाला सांगितला, तर तुझ्या घराचा सत्यानाश करेल, अशी धमकी दिली. दरम्यान तालुका पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक रुपाली महाजन यांच्यासमोर दिलेल्या जबाबादावरून संशयित आरोपी भारत सुभाष सूर्यवंशी यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवारी १४ जुलै रोजी रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस उपअधीक्षक आप्पासो पवार हे करीत आहे.

Exit mobile version