Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अपघातात एका जणाच्या मृत्यू प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील शिवाजीनगर ते ममुराबाद नाका दरम्यान खड्डयात दुचाकी कोसळून यात दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना २२ ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी तब्बल आठ दिवसानंतर मंगळवार, ३० ऑगस्ट रोजी जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

शिवाजीनगर येथील सैफअली मुश्ताकअली सय्यद हा त्याच्या दुचाकीने ममुराबाद नाका परिसरातून जात होता. यादरम्यान दुचाकीवर मागे मुस्ताकअली ईस्माईल अली सैय्यद हा बसलेला होता. यादरम्यान भरधाव दुचाकी एका खड्‌डयात कोसळली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला मुस्ताकअली ईस्माईल अली याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केली.

यात सैफअली हा अपघातास जबाबदार असल्याने निष्पन्न झाले. त्यानुसार मंगळवारी पोलीस नाईक ललीत भदाणे यांच्या फिर्यादीवरुन सैफअली सैय्यद यांच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी करीत आहेत.

Exit mobile version