Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खेडी येथील महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी वकिलाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कौटुंबिक न्यायालयात पोहचलेल्या पती-पत्नीच्या वादप्रकरणी महिलेने पतीला फारकत द्यावी यासाठी पतीचे वकील वैभव जोशी (रा. खेडी ता. जळगाव) यांनी मीना यांना पतीला फारकत दे अन्यथा खोट्या केस करून तुला बर्बाद करेल, अशी धमकी दिली. तसेच जातीवाचक शब्द वापरल्याने वकील जोशी यांच्याविरुद्ध शनिवार १६ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील खेडी बुद्रुक येथील पती-पत्नी  यांच्यातील वाद कौटुंबिक न्यायालयात पोहचला आहे. यात वैभव जोशी हे महिलेच्या पती यांचे वकील आहे. महिला या वकील जोशी यांच्याकडे गेल्या असता त्यांच्याशी जोशी यांनी अश्लील भाषेत बोलत जातीवाचक उच्चार केला. खोट्या केसमध्ये अडकून बर्बाद करेल, अशी धमकी देत ते महिलेसह  यांच्यासह त्यांच्या आईच्या अंगावर धावून गेले. ही घटना  २७ सप्टेंबर रोजी घडली होती. या सोबतच अन्य चार जणांनीदेखील शिवीगाळ केली.

या प्रकरणी महिला यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ५ जणांविरुद्ध ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित करीत आहेत.

Exit mobile version