Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भीषण अपघातात मायलेकाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील खिर्डी फाट्याजवळ भीषण अपघात समता नगरातील माय-लेकाच्या मृत्यूप्रकरणी मंगळवारी १० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात ट्रक चालकावर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुबेदाबी अल्ताफ बेग (वय-३८) आणि कामील अल्ताफ बेग (वय-२०, दोन्ही रा रा. समता नगर) असे मयत झालेल्या माय-लेकाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील समतानगरातील रहिवासी जुबेदाबी या महिला त्यांचा मुलगा कामील बेग याच्यासोबत ३ जानेवारी रोजी सावदा येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. साखरपुडा आटोपून मायलेक दुचाकी (एमएच १९, डीएक्स ८१५८)वरून सायंकाळी साडेपाचला जळगावला येण्यासाठी निघाले होते. समोरून येणाऱ्या (एमपी ०९, एमझेड ७६३७) क्रमांकाच्या दुचाकीस्वराने कामील बेग याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार खाली फेकले गेले. कामीलच्या दुचाकीवर मागे बसलेली त्याची आई जुबेदाबी महामार्गावर फेकल्या गेल्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक(एमपी १० एमझेड ७६३७)च्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. जखमी झालेला कामील अलताफ बेग याचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेबाबत मंगळवारी १० जानेवारी रेाजी सायंकाळी ६ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अलताब बेग हुसेन बेग रा. समता नगर, जळगाव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ट्रकचालकाविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहे.

Exit mobile version