Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नागझीरी शिवारातील गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करतांना तीन ट्रॅक्टर दिसून आले. जळगाव महसूल विभाग कारवाई करत असतांना वाळू खाली करून वाहने घेवून पसार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत शनिवारी १६ जुलै रोजी सायंकाळी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

गिरणा नदी पात्रातून बेकायदेशीररित्या वाळूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत आहे. या अनुषंगाने जळगाव तहसील कार्यालयाचे मंडळाधिकारी योगेश नन्नवरे, अशिष वाघ, दिनेश उगले, अजिंक्य आंधळे, रमेश वंजारी, मोहाडी तलाठी सारीका दुरगंडे, धामणगाव तलाठी रविंद्र घुले, तरसोद तलाठी अनिरूध्द खेतमाळस, खेडी खुर्द तलाठी रूपेश ठाकूर, पिंप्राळा तलाठी संदीप डोभाळ यांनी नागझीरी शिवारातील गिरणा नदी पात्रात धड कारवाई केली. यावेळी तीन ट्रक्टरमध्ये बेकायदेशीर विना परवाना वाळूची चोरटी वाहतूक करत असतांना आढळून आले.

 

महसुल पथकाला पाहून ट्रक्टर चालकांना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतील वाळू खाली करून ट्रॅक्टर ट्रॉलीसह घेवून पसार झाले. याप्रकरणी पिंप्राळा मंडळाधिकारी किरण खंडू बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर मालक गजानन सोनवणे उर्फ मेजर सोनवणे रा. मोहाडी रोड, जळगाव, देविदास बबन ढेकळे रा. मोहाडी रोड, जळगाव आणि संदीप गिरधर सपकाळे रा. मोहाडी ता. जळगाव यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल मोरे करीत आहे.

 

Exit mobile version