Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अपघातात वृध्दाच्या मृत्यू प्रकरणी दुचाकीचालकावर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी| तालुक्यातील नशिराबाद टोल नाक्याजवळ दुचाकी गटारीच्या धाब्याला धडक दिल्याने ६२ वर्षीय वृध्द रस्त्यावर पडले तेवढ्यात भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यूची झाल्याची घटना शनिवारी ६ एप्रिल रोजी सकाळी ९.१५ वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी मंगळवारी ९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता नशिराबाद पोलीसात दुचाकीचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र प्रभाकर चौधरी वय -६२ रा. पाडळसे ता. भुसावळ असे मयत झालेल्या वृध्दाचे नाव आहे.

नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील पाडळसे येथे रविंद्र चौधरी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. ते जळगव येथील राजू राणे यांच्या एलपीजी पेट्रोल पंपावर कामावर होते. दरम्यान, नेहमीप्रमाणे शनिवारी ६ एप्रिल रोजी त्यांचे सहकारी विनोद दामू तळेले वय-४७ रा. भुसावळ यांच्या सोबत दुचाकीने जळगावला कामावर येण्यासाठी निघाले. सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास नशिराबाद टोलनाक्याजवळून जात असतांना विनोद तळेले यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी गटारीच्या धाब्यावर आदळली. त्यात रविंद्र चौधरी हे रस्त्यावर पडले. त्यामुळे जळगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या आयशर वाहनाच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या घटनेत रविंद्र चौधरी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीचालक विनोद दामू तळेले याच्यावर मंगळवारी ९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र ठाकरे हे करीत आहे.

Exit mobile version