Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अपघातात बापलेक जखमी झाल्याप्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीला धडक दिल्याने पित्रा-पूत्र जखमी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी ट्रकचालका विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगावकडून बांभोरीकडे दुचाकीवर जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकने (क्र. एचएच ३१, एफ ४७४५) दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीला धडक दिली होती. त्यात दुचाकीवरील दीपक गोकूळ सोनवणे व नयन दीपक सोनवणे हे पिता-पूत्र जखमी झाले होते. हा अपघात गुरुवार, २६ ऑक्टोबर रोजी महामार्गावर वाटिकाश्रमाच्या पुढे झाला होता. या प्रकरणी राजू श्यामराव सपकाळे (५१, रा. बांभोरी, ता. धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धडक देणाऱ्या ट्रकचालकाविरुद्ध २८ ऑक्टोबर रोजी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहकॉ अनिल फेगडे करीत आहेत.

Exit mobile version