Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात महिलेचा विनयभंग करणाऱ्या जेठावर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील दीक्षित वाडी येथील महिलेचा अविवाहित जेठाने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने तात्काळ आरडा ओरड केल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने तिची सुटका करण्यात आली. याप्रकरणी संशयिताविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दीक्षित वाडी परिसरात पंचवीस वर्षीय विवाहिता आपल्या दोन मुलींसह वास्तव्यास आहे. पती रुग्णालयात असल्याने ती मण्यांची पोत बनवण्याचे काम करून उदरनिर्वाह चालवते. मात्र, शनिवार(दि.५) रोजी रात्री १० वाजता पिडीतेचा जेठ नीलेश किशनलाल परिहार घरात शिरला व त्याने तोंड दाबून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याचा प्रतिकार करून आरडाओरड केल्याने शेजाऱ्यांनी मदतीला धाव घेतली आणि तिची सुटका केली. घडलेला सर्व प्रकार पिडीतेने बहिणीला सांगितला, यानंतर मेहुणे अंकुश सोनवणे, सामाजिक कार्यकर्त्या महिलांच्या मदतीने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणले. पिडीतेने दिलेल्या जबाबावरून निलेश सोनवणे याच्या विरुद्ध विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Exit mobile version