भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील पिंप्री सेकम शिवारातील सुदगाव वॉटर पंप हाऊस येथे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी बुधवार १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील पिंप्री सेकम शिवारातील सुदगाव वॉटर पंप हाऊस येथे प्रदूषण मोजणारी यंत्रणा बसवण्याचे काम सुरू असताना यावेळी कार्यालयाच्या गेट समोर संघर्ष समिती पिंप्री सेकम अध्यक्ष रमाकांत प्रल्हाद चौधरी यांच्यासह त्यांच्यासोबत असलेले आंदोलनकर्त्यांनी दिपनगर येथील उपमुख्य अभियंता यांच्यासह अधिकाऱ्यांचा रस्ता अडून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच मुख्य अभियंता प्रकल्प अधिकारी यांनी वेळोवेळी दिलेल्या नोटिसाकडे दुर्लक्ष केले आहे. दरम्यान याप्रकरणी दीपनगर येथील उपमुख्य अभियंता संतोष प्रल्हाद वाखरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आंदोलनकर्ते रमाकांत प्रल्हाद चौधरी, रवींद्रसिंग कुलदीपसिंग सोहेल, गणेश सुखदेव तायडे, सुभाष रामकृष्ण पाटील, गणेश डोंगर तायडे, जालिंदर पाटील, विशाल विजय पाटील सर्व रा. पिंप्री सेकम ता. भुसावळ यांच्या विरोधात बुधवारी १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय कंकरे करीत आहे.