Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मालवाहू वाहनाची कारला धडक

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मंगलमुर्ती चौकात मालवाहू वाहनाची कारला धडक दिल्याची घटना सोमवारी ११ मार्च रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे. यापकरणी दुपारी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात मालवाहू वाहनावरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नथ्थू गुणवंतराव सोनवणे वय ४४ रा. ढेकू ता. अमळनेर हे आपल्या सहकाऱ्यांसोबत कार क्रमांक (एमएच १९ डीव्ही ४२८९) ने सोमवारी ११ मार्च रोजी दुपारी ३ वाजता अमळनेर शहरात आलेले होते. शहरातील मंगलमुर्ती चौकात आल्यानंतर समोरून येणारे मालवाहू वाहन क्रमांक (एमएच १९ सीवाय ९३८२) ने कारला धडक दिली. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. हा अपघात घडल्यानंतर मालवाहू वाहनावरील चालक वाहन घेवून पसार झाला. प्रकरणी दुपारी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार मालवाहू वाहनावरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ हितेंश चिंचोरे हे करीत आहे.

Exit mobile version