Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोलीस अधीक्षक कार्यालय शेजारी बस चालकाला चौघांकडून मारहाण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालय शेजारी असलेल्या राम मंदिरासमोरून बस घेऊन जात असलेल्या बस चालकाला दोन जणांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे याप्रकरणी रविवार 14 ऑगस्ट रोजी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नरेंद्र दिनकर पाटील वय 35 रा. निवृत्ती नगर हे त्यांच्या ताब्यातील एम एच 20 डी एल 40 95 ही बस ठाणे येथून जळगाव कडे घेऊन येत होते. स्वातंत्र्य अमृत महोत्सवाच्या झाल्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालय ते स्वातंत्र्य चौक परिसरातील रस्ता वनवे करण्यात आला होता. याच नरेंद्र पाटील हे गर्दीतून बस हळूहळू चालवत असताना पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या शेजारी असलेल्या राम मंदिराजवळ दुचाकीवरील कुणाल महेश कोळंबे रा. केमिस्ट भवन समोर जळगाव, व मोहित रमेश लाल काटपाल रा. नेत्र ज्योती हॉस्पिटल समोर जळगाव यांच्यासह दोन जणांनी बस अंगावर आणतो का असे म्हणत बस चालक नरेंद्र पाटील यांना शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बस चालक नरेंद्र दिनकर पाटील यांच्या तक्रारीनुसार कुणाल कोळंबे , महेश काटपाल या दोघांसह आणखी दोन जणांविरोधात जिल्हा पेठ पोलिसात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार हे करीत आहेत.

Exit mobile version