Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाच हजाराची लाच भोवली; मालोदच्या कोतवालासह एका पंटरला रंगेहात पकडले

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा येथील शेतावरील सातबारा उताऱ्यावर नाव कमी करून देण्याच्या मोबदल्यात ५ हजाराची लाच स्विकारणाऱ्या कोतवालासह एका पंटरला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. याबाबत यावल पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

 

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांचे यावल तालुक्यातील सावखेडासिम शिवारात शेत आहे. शेतजमीनीचे सातबारा उताऱ्यावरील इतर अधिकार नोंद मधील तक्रारदार यांची बहिण यांचे नाव मंडळाधिकारी किनगाव यांच्याकडून कमी करण्याची विनंती तालुक्यातील मालोद तलाठी कार्यालयातील कोतवाल जहाँगीर बहादूर तडवी (वय-५६) रा. मालोद ता. यावल जि.जळगाव यांच्याकडे केली. त्यानुसार सातबारा उताऱ्यावरील नाव कमी करण्याच्या मोबदल्यात ५ हजाराची मागणी केली. त्यानुसार मंगळवारी तालुक्यातील किनगाव येथील जनरल स्टोअर्स जवळी कोतवाल जहाँगीर तडवी यांच्या सांगण्यावरून दुकानदार मनोहर दयाराम महाजन (वय-४५) रा. किनगाव ता. यावल याने तक्रारदार यांच्याकडून ५ हजाराची लाचेची रक्कम स्विकारली. त्यावेळी लाचलुपपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून दोघांना कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी यावल पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Exit mobile version